07 July 2020

News Flash

कडव्या झुंजीनंतर फेडरर तिसऱ्या फेरीत

द्वितीय मानांकित कॅरोलिन वोझ्नियाकीला पराभवाचा धक्का

द्वितीय मानांकित कॅरोलिन वोझ्नियाकीला पराभवाचा धक्का

द्वितीय मानांकित रॉजर फेडररला अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठण्यासाठी संघर्ष करावा लागला. मात्र माजी विजेत्या नोव्हाक जोकोव्हिच व मरिन चिलिच यांनी सहज पुढील फेरीत आगेकूच केली. महिलांमध्ये द्वितीय मानांकित कॅरोलिन वोझ्नियाकीला दुसऱ्या फेरीतच स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.

फेडररने बेनॉट पेरीवर ७-५, ६-४, ६-४ असा विजय मिळवला. सहाव्या मानांकित जोकोव्हिचने टेनेस सँडग्रेनला ६-१, ६-३, ६-२ असे नमवले, तर सातव्या मानांकित चिलिचने ह्य़ूबर्ट हुक्राजला ६-२, ६-०, ६-० अशी धूळ चारली.

महिलांमध्ये युक्रेनच्या बिगरमानांकित लेसिया सुरेन्कोने वोझ्नियाकीला ६-४, ६-२ असे पराभूत करीत तिचे आव्हान संपुष्टात आणले. मारिया शारापोव्हाने सोराना क्रिस्टियावर ६-२, ७-५ अशी मात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2018 2:31 am

Web Title: american open 2018 roger federer
Next Stories
1 CSKच्या ‘या’ खेळाडूने वाढदिवशीच घेतला निवृत्तीचा निर्णय…
2 Asian Games 2018 : भारतीय महिलांनी ‘सुवर्ण’संधी गमावली; अंतिम फेरीत जपान २-१ ने विजयी
3 Asian Games 2018 – Sailing क्रीडा प्रकारात भारताला ३ पदकं
Just Now!
X