13 December 2017

News Flash

सेरेना विल्यम्स होणार आई

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते

न्यूयॉर्क | Updated: April 20, 2017 1:54 PM

महिला टेनिसपटूंच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेली सेरेना रेड्डिटचा सहसंस्थापक अॅलेक्सिस ओहानियनला डेट करत आहे.

ग्रँड स्लॅम सम्राज्ञी सेरेना विल्यम्स आता आई होणार आहे. सेरेना २० आठवड्यांची गरोदर असून दोन महिन्यांची गरोदर असतानाही तिने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते अशी माहिती समोर आली आहे.

सेरेना विल्यम्सने बुधवारी स्नॅपचॅटवर पिवळ्या रंगाच्या स्विमसूटमधील एक फोटो अपलोड केला होता. या फोटोखाली सेरेनाने २० वीक्स (२० आठवडे) अशी कॅप्शन दिली होती. तेव्हापासून सेरेना गरोदर आहे की नाही यावर चर्चा रंगली होती. चर्चा सुरु होताच सेरेनाने हा फोटो डिलिट केला होता. शेवटी काही तासांनी सेरेनाच्या प्रसिद्धीप्रमुखांनी ती गरोदर असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. सेरेना गरोदर असल्याचे स्पष्ट होताच जगभरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जानेवारीमध्ये सेरेनाने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. महिला टेनिसमध्ये अमेरिकेची महासत्ता प्रस्थापित करणाऱ्या सेरेनाचे हे २३ वे जेतेपद होते. या स्पर्धेच्या वेळी सेरेना २ महिन्यांची गर्भवती होते हे आता स्पष्ट झाले आहे.

सध्या महिला टेनिसपटूंच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेली सेरेना रेडिटचा सहसंस्थापक अॅलेक्सिस ओहानियनला डेट करत होती. १५ महिने डेट केल्यानंतर त्यांचा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये साखरपुडा झाला. अॅलेक्सिस ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सेरेनाच्या सामन्यांमध्ये उपस्थित असायचा. सेरेनाला महिला टेनिस संघटना तसेच अन्य खेळाडूंनीही ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. अॅलेक्सिसने कमी वयातच स्वतःची कंपनी सुरु केली होती. अॅलेक्सिसचे वडील अमेरिकन असून आई जर्मन वंशाची आहे. सेरेना ही ३५ वर्षांची आहे तर अॅलेक्सिस ३३ वर्षांचा आहे.

First Published on April 20, 2017 1:38 pm

Web Title: american tennis player serena williams confirms pregnancy rumours reddit co founder alexis ohanian