News Flash

अमेरिकेच्या महिलांचे निर्विवाद वर्चस्व

याच क्रीडाप्रकारातील अन्य दिव्यांग विभागात अमेरिकेच्या ग्रेस नॉर्मन हिने सोनेरी कामगिरी केली.

| September 13, 2016 03:43 am

अमेरिकेवरील अतिरेकी हल्ल्यास ११ सप्टेंबर रोजी पंधरा वर्षे पूर्ण झाली असली तरी त्याच्या स्मृती अजूनही सर्वानाच स्मरणात आहेत. या दिवशी ट्रायथलॉनमध्ये तीनही पदके मिळविण्याचे अमेरिकन महिलांचे स्वप्न येथे साकार झाले. ट्रायथलॉनचा या स्पर्धामध्ये प्रथमच समावेश करण्यात आला आहे. अमेरिकेच्या अ‍ॅलिसा सिएली हिने ही शर्यत एक तास २२ मिनिटे व ५५ सेकंदांमध्ये जिंकली. त्यानंतर ४८ सेकंदांनी ही शर्यत पूर्ण करणाऱ्या हॅली डॅनिसेविझ हिला रौप्यपदक मिळाले, तर मेलिसा स्टोकवेल हिने कांस्यपदक जिंकून अमेरिकेस निर्विवाद यश मिळवून दिले. याच क्रीडाप्रकारातील अन्य दिव्यांग विभागात अमेरिकेच्या ग्रेस नॉर्मन हिने सोनेरी कामगिरी केली.

स्टोकवेलचे संस्मरणीय कांस्यपदक

स्टोकवेल ही इराकमध्ये २००४ मध्ये अमेरिकेने केलेल्या हल्ल्याच्या वेळी सैनिक म्हणून सहभागी झाली होती. त्या वेळी इराकी सैनिकांनी रस्त्यावर पेरलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यामध्ये स्टोकवेल हिला पाय गमवावा लागला होता. पाय गमावणारी ती पहिलीच अमेरिकन महिला सैनिक होती. तिने जिद्दीने ट्रायथलॉनचा सराव केला आणि पारा ऑलिम्पिकचे पदक मिळविण्याचे ध्येय साकार केले.

सांगता समारंभात थांगवेलू भारताचा ध्वजवाहक

उंचउडीत सुवर्णपदक मिळविणारा अ‍ॅथलिट मरियप्पन थांगवेलू याला पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या सांगता समारंभात भारताचा ध्वज नेण्याचा मान मिळणार आहे. हा समारंभ १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. भारतीय ऑलिम्पिक महासंघाने ही माहिती दिली. ंगवेलू याने अमेरिकेचा विश्वविजेता खेळाडू सॅम ग्रेवे याच्यावर मात करीत सुवर्णपदक जिंकले होते. पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो भारताचा तिसरा खेळाडू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 3:43 am

Web Title: american woman domination in olympic
Next Stories
1 पॅरालिम्पिकमध्ये दीपाने रचला इतिहास, गोळाफेकमध्ये मिळवले रौप्य पदक
2 महिला कुस्तीपटूंच्या जागतिक क्रमवारीत साक्षी मलिकची चौथ्या स्थानी झेप
3 ..हे पाच विक्रम भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेत मोडीत निघू शकतात