करोना विषाणूचा सामना करण्यासाठी संपूर्ण जगभरात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. या काळात सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने रद्द करण्यात आले आहेत. सर्व खेळाडू या काळात आपल्या घरी राहून परिवारासोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करत होते. दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेनला या काळात चोरट्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांत ३ वेळा आपल्या घरात चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती स्टेनने ट्विटरवरुन दिली आहे.

१ जूनपासून दक्षिण आफ्रिकेत लॉकडाउनता तिसरा टप्पा सुरु झाला आहे. पण या काळात अनेक महत्वाच्या शहरांमध्ये गुन्हे वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी आपल्या मित्राच्या कारचं चोरट्यांनी नुकसान केल्याचं स्टेनने म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीट स्टेनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारत आता आपण फक्त मर्यादीत षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सांगितलं. ९३ कसोटी सामन्यात स्टेनने ४३९ बळी घेतले आहेत. तर वन-डे आणि टी-२० क्रिकेटमध्ये स्टेनच्या नावावर १९६ आणि ६४ बळी जमा आहेत.