16 October 2019

News Flash

World Boxing Championship : अमित पांघलची ऐतिहासिक कामगिरी, अंतिम फेरीत धडक

अंतिम फेरी गाठणारा अमित पहिला भारतीय पुरुष खेळाडू

भारतीय बॉक्सर अमित पांघलने जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अशी कामगिरी करणारा अमित पहिला पुरुष बॉक्सर ठरला आहे. २०१८ साली झालेल्या आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अमितने ५२ किलो वजनी गटात उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या साकेन बिबॉसिनोव्हचा पराभव केला. शनिवारी होणाऱ्या अंतिम फेरीत अमितसमोर उझबेगिस्तानच्या झोरिव्हचं आव्हान असणार आहे. दुसरीकडे ६३ किलो वजनी गटात भारताच्या मनिष कौशिकला मात्र उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

२०१७ साली झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केल्यानंतर अमितच्या कामगिरीत कमालीची सुधारणा झाली आहे. २०१७ साली जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अमित उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहचला होता. त्यामुळे अंतिम फेरीत अमितच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

First Published on September 20, 2019 5:17 pm

Web Title: amit panghal creates history becomes first indian male boxer to reach world championship final psd 91