14 August 2020

News Flash

जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : अमित पांघल, मनीष कौशिकची आगेकूच

दुसऱ्या मानांकित २३ वर्षीय अमितने प्रतिस्पर्ध्याचा ५-० असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

आशियाई विजेत्या अमित पांघलने (५२ किलो) चायनीज तैपेईच्या टू पो-वेई याचा सहज धुव्वा उडवत जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या पदकाच्या दिशेने कूच केली आहे. मनीष कौशिक (६३ किलो) यानेही आपली लढत सहज जिंकत आगेकूच केली.

दुसऱ्या मानांकित २३ वर्षीय अमितने प्रतिस्पर्ध्याचा ५-० असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. त्याला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. मनीषने नेदरलँड्सच्या एन्रिको लॅकरूझ याच्यावर ५-० अशी निर्विवाद हुकूमत गाजवली.

अमितने आपल्या धारदार ठोशांनी पो-वेईवर वर्चस्व गाजवले. अमितने आक्रमक खेळ करून पो-वेईला पूर्णपणे नामोहरम केले. आता उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमितला तुर्कीच्या बाटूहान सिफ्टसी याच्याशी लढत द्यावी लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2019 12:56 am

Web Title: amit panghal manish kaushik ahead world boxing competition abn 97
Next Stories
1 भारतीय कुस्तीपटूंची निराशाजनक सुरुवात
2 सौरभ वर्मा अंतिम फेरीत
3 धोनीबद्दलच्या त्या ट्विटनंतर विराटचा कानाला खडा
Just Now!
X