News Flash

आयपीएल पदार्पणासाठी अमला सज्ज

पंजाबच्या संघापुढे अमलाचा उत्तम पर्याय उपलब्ध असून त्याला आगामी सामन्यात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हशिम अमला आयपीएलमधील पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघातील ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू शॉन मार्शला दुखापतीमुळे यापुढे स्पर्धेत खेळता येणार नाही. त्यामुळे पंजाबच्या संघापुढे अमलाचा उत्तम पर्याय उपलब्ध असून त्याला आगामी सामन्यात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

‘आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. पंजाबच्या संघातून खेळण्याची संधी मला मिळणार आहे. मला कायम पाठिंबा देणाऱ्यांचे आभार,’ असे अमलाने सांगितले.

सध्याच्या घडीला पंजाबचा संघ गुणतालिकेत तळाला आहे. अमलाच्या  येण्याने पंजाबची फलंदाजी बळकट होणार का, याची उत्सुकता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2016 5:59 am

Web Title: amla is ready to debut in indian premier league
टॅग : Indian Premier League
Next Stories
1 भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव
2 दिवस-रात्र कसोटी सामन्यांसाठी कॅब प्रयत्नशील
3 सर्वोच्च न्यायालयात बीसीसीआयची कोंडी
Just Now!
X