28 October 2020

News Flash

‘एमसीए’च्या कार्यकारिणीची मंगळवारी तातडीची बैठक

यासंदर्भात क्रिकेट सुधारणा समितीने काही प्रश्न उपस्थित केले होते

| September 20, 2020 03:15 am

मुंबई : क्रिकेट सुधारणा समितीच्या सूचनांसंदर्भात मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) मंगळवारी कार्यकारिणी समितीची तातडीची बैठक बोलावली आहे. लालचंद रजपूत यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सुधारणा समितीत राजू कुलकर्णी आणि समीर दिघे यांचा समावेश आहे. वरिष्ठ आणि अन्य वयोगटांच्या क्रिकेट संघांसाठी प्राथमिक निवड प्रक्रियेतून निवडलेल्या २४ जणांच्या मुलाखती काही दिवसांपूर्वी झाल्या. यासंदर्भात क्रिकेट सुधारणा समितीने काही प्रश्न उपस्थित केले होते. याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक आमंत्रित करण्यात आली आहे.

‘‘७० वष्रे ओलांडलेल्या व्यक्तीकडे निवड समितीची जबाबदारी देता येईल का? ‘एमसीए’ची प्रतिमा जनमानसात डागाळणाऱ्या व्यक्तीला कोणतेही पद देता येईल का? वार्षिक सर्वसाधारण सभेने काढून टाकलेल्या निवड समिती सदस्याला पुन्हा पदभार स्वीकारता येईल का? अशा तीन विषयांवर कार्यकारिणीच्या बैठकीत प्रामुख्याने चर्चा होईल,’’ असे सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2020 2:13 am

Web Title: an emergency meeting of the mca executive on tuesday zws 70
Next Stories
1 नव्या विजेत्यांचे राज्य!
2 डाव मांडियेला : दुसऱ्या हाती छोटं पान
3 ‘फिफा’ आणि क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धाना करोनाचा फटका
Just Now!
X