01 December 2020

News Flash

आनंदकडून डिंग लिरेनचा पराभव

विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने चीनच्या डिंग लिरेनचे संरक्षण भेदून दिमाखदार विजयाची नोंद केली आणि अलेखिने स्मृती बुद्धिबळ स्पध्रेच्या पाचव्या फेरीअखेर सहाव्या स्थानावर मजल मारली आहे.

| April 27, 2013 03:22 am

विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने चीनच्या डिंग लिरेनचे संरक्षण भेदून दिमाखदार विजयाची नोंद केली आणि अलेखिने स्मृती बुद्धिबळ स्पध्रेच्या पाचव्या फेरीअखेर सहाव्या स्थानावर मजल मारली आहे.
जागतिक क्रमवारीतील तिसऱ्या क्रमांकावरील अर्मेनियाच्या लिव्हॉन अरोनियनला पराभवाचा धक्का देण्याची किमया साधणाऱ्या लिरेनचा आनंदपुढे निभाव लागला नाही. आनंदने आरामात विजयाची नोंद केली. मॅक्झीम व्हॅचिअर-लाग्रेव्ह ३.५ गुणांसह एकटा आघाडीवर आहे. फ्रान्सच्या लॉरेंट फ्रेसिनेटने रशियाच्या व्लादिमिर क्रामनिकला पराभूत करून संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे.
सलामीच्या सामन्यातील पराभव आणि त्यानंतर तीन लढती अनिर्णीत राखणाऱ्या आनंदने लिरेनला पूर्णत: निष्प्रभ केले. आनंदने किंग साइड आक्रमणाची चाल रचली आणि फक्त ३२ चालींत शानदार विजयाची नोंद केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 3:22 am

Web Title: anand defeted to ding liren
टॅग Sports
Next Stories
1 उपनगर खो-खो : दत्तसेवाची कमाल
2 मुंबई खो-खो : श्री समर्थ, सरस्वती विजेते
3 ..होनी कर दे धोनी!
Just Now!
X