News Flash

आनंदचा पराभव

भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदची लंडन बुद्धिबळ क्लासिक स्पध्रेतील अडथळ्यांची शर्यत कायम आहे

| December 12, 2015 01:18 am

विश्वनाथन आनंद

भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदची लंडन बुद्धिबळ क्लासिक स्पध्रेतील अडथळ्यांची शर्यत कायम आहे. सहाव्या फेरीत आनंदला रशियाचा ग्रँडमास्टर अलेक्झांडर ग्रिस्चुकने पराभूत केले. या पराभवामुळे आनंदची नवव्या स्थानावर घसरण झाली आहे.
सलग तीन डावांत बरोबरीवर समाधान मानावे लागल्यानंतर आनंदला चौथ्या फेरीत हिकारू नाकामुराने पराभूत केले. त्यानंतर पाचव्या फेरीत आनंदने संघर्ष करत व्हॅसेलीन टोपालोव्हवर विजय मिळवून स्पध्रेतील आव्हान कायम राखले. मात्र पुन्हा त्याच्या वाटय़ाला पराभव आल्याने तो चौथ्या स्थानावरून नवव्या स्थानावर गेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2015 1:18 am

Web Title: anand loose his match
टॅग : Chess
Next Stories
1 महिन्याभरात मलिका झाली नाही, तर वर्षभरात होणे कठीण
2 भारत-पाक सामना.. १९ मार्च २०१६
3 श्रीकांत मुंडेचा अष्टपैलू खेळ महाराष्ट्राचा ओदिशावर विजय
Just Now!
X