न्यूझीलंड ग्रां.प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत आनंद पवारच्या पराभवासह भारताचे स्पर्धेतले आव्हान संपुष्टात आले. दक्षिण कोरियाच्या तिसऱ्या मानांकित ली ह्य़ुन दुसरा याने अकराव्या मानांकित आनंदवर २१-१४, २१-७ अशी मात केली. या विजयासह लीने आनंदविरुद्धच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे.  मिश्र दुहेरीत झेंग सि वेई आणि चेन क्विंगचेन जोडीने रचिता सहदेव आणि अभिनव मिनोत जोडीवर २१-७, २१-१० असा विजय मिळवला.