21 January 2018

News Flash

आनंदचा एर्विनवर विजय, कार्लसनची आघाडी कायम

भारताचा विश्वविजेता ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने नेदरलँड्सच्या एर्विन अल-अमी याच्यावर शानदार विजय मिळवत टाटा स्टील करंडक बुद्धिबळ स्पर्धेतील बाराव्या फेरीत उल्लेखनीय कामगिरी केली.

विज्क अ‍ॅन्झी | Updated: January 28, 2013 2:21 AM

भारताचा विश्वविजेता ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने नेदरलँड्सच्या एर्विन अल-अमी याच्यावर शानदार विजय मिळवत टाटा स्टील करंडक बुद्धिबळ स्पर्धेतील बाराव्या फेरीत उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने लिव्हॉन अरोनियन (अर्मेनिया) याच्यासह प्रत्येकी आठ गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे. जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित खेळाडू मॅग्नस कार्लसन याने साडेनऊ गुणांसह आघाडी राखली आहे. कार्लसनने अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा याच्यावर मात केली. भारताच्या पी. हरिकृष्ण याने चीनच्या वाँग हाओविरुद्धच्या डावात बरोबरी स्वीकारली. हरिकृष्ण याचे आता सहा गुण झाले आहेत. आनंद व एर्विन यांच्यातील डाव अतिशय रंगतदार झाला. आनंदने डावाच्या शेवटी उत्कृष्ट डावपेचांचा उपयोग करीत हा डाव ५४व्या खेळीस जिंकला.

First Published on January 28, 2013 2:21 am

Web Title: anand won against arvin al amin carlson continued forefront
  1. No Comments.