सातत्यपूर्ण कामगिरीशी झगडत असलेल्या माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला शनिवारपासून सुरू होणाऱ्या लंडन बुद्धिबळ क्लासिक स्पध्रेत कामगिरी सुधारण्याची संधी आहे. या स्पध्रेत पहिल्याच फेरीत आनंदला इंग्लंडच्या मायकेल अ‍ॅडम्सशी सामना करावा लागेल. गतविजेता आनंद पांढऱ्या मोहऱ्यांनी अ‍ॅडम्सविरुद्ध खेळणार आहे. जगातील अव्वल दहामधील सात खेळाडूंचा या स्पध्रेत सहभाग असल्याने आनंदसमोरील आव्हाने सामन्यागणिक वाढत जाणार आहेत. उर्वरित तीन खेळाडू हे अव्वल २० जणांमधील आहेत. नऊ फेऱ्यांमध्ये होणाऱ्या या स्पध्रेत चुरशीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.