कोरे अँडरसनच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर न्यूझीलंडने तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात पाकिस्तानचा ९५ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १९६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. मार्टिन गुप्तली (४२) आणि केन विल्यम्सन (३३) यांनी ५७ धावांची सलामी नोंदवल्यावर कोरे अँडसरनने ४२ चेंडूंत ६ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ८२ धावा केल्या.

त्यानंतर पाकिस्तानचा डाव १६.१ षटकांत १०१ धावांत आटोपला. सर्फराझ अहमदने सर्वाधिक ४१ धावा केल्या.

अ‍ॅडम मिलने याने ८ धावांत ३ तर ग्रँट एलियटने ७ धावांत ३ बळी घेतले. अँडरसनने १७ धावांत २ बळी घेतले आणि सामनावीर किताब पटकावला.