News Flash

महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत अ‍ॅँडरसनचा सहभाग निश्चित

पाच एटीपी विजेतेपद पटकावल्यानंतर अ‍ॅँडरसन हा जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानापर्यंत झेप घेण्यात यशस्वी ठरला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या केव्हिन अ‍ॅँडरसनने पुढील वर्षी होणाऱ्या महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे म्हाळुंगे येथील बालेवाडी स्टेडियममध्ये होणाऱ्या या स्पर्धेत तो आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरणार आहे.

पाच एटीपी विजेतेपद पटकावल्यानंतर अ‍ॅँडरसन हा जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानापर्यंत झेप घेण्यात यशस्वी ठरला आहे. राफेल नदाल, नोव्हाक जोकोव्हिच, ज्युआन मार्टिन डेल पोत्रो, रॉजर फेडरर आणि अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांच्यापाठोपाठ जागतिक टेनिस क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेला अ‍ॅँडरसनने पुन्हा या स्पर्धेत भाग घेण्याचे कबूल केले आहे. गतवर्षी झालेल्या स्पर्धेत अँडरसनसह मरिन चिलिच आणि सिमॉन गाइल्सचाही समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 4:17 am

Web Title: anderson participation in the maharashtra tennis tournament
Next Stories
1 भारताचे मालिका विजयाचे लक्ष्य!
2 सचिन-विनोद पुन्हा मैदानात, आशीर्वादासाठी आचरेकर सरांकडे
3 Pro Kabaddi Season 6 : घरच्या मैदानात पाटणा पायरेट्सचा पराभवाचा चौकार, बंगळुरुची सामन्यात बाजी
Just Now!
X