वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज आंद्रे रसल याने पत्नीसोबत क्रिकेट खेळून एक महत्वाची घोषणा केली आहे. रसलने त्याच्या इंस्टाग्रामच्या अकांउटवरुन याबाबतची माहिती दिली आहे. रसलने त्याच्या घरी एक कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमा दरम्यान त्याने त्याच्या घरी लहान पाहुणा येणार असल्याची गोड बातमी साऱ्यांना दिली. आंद्रे रसल हा पहिल्यांदाच बाबा होणार आहे. या निमित्ताने रसलने त्याच्या घरी एका कार्यक्रमात बाबा होण्याचा आनंद हटक्या पद्धतीने साजरा केला.

रसलने पत्नी जेसीम लॉरा हिच्यासोबत एक व्हिडिओ शूट केला. त्यात तो तिच्यासोबत क्रिकेट खेळताना दिसला. तो व्हिडीओ त्याने इंस्टाग्रामच्या अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला हजारो इंस्टाग्राम युझर्सने लाइक केले आहे.

पहा व्हिडीओ –

आंद्रे रसलने प्रथम बाबा होण्याच्या आनंदात त्याने बेबी रसल या कार्यक्रमाचे आयोजन केले होतो. या कार्यक्रमात रसलने त्याच्या मित्रांनाही सहभागी करुन घेतले होते. आंद्रे रसलने त्याच्या अधिकृत ट्विटर अकांउटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रसलने हातात बॅट धरली आणि पत्नी जेसीमने त्याला चेंडू टाकला. तो चेंडू टोलवत त्याने आनंद साजरा केला. मुलगा असो की मुलगी; देवाने आम्हाला तंदुरूस्त बाळ द्यावे, असे त्याने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीले आहे.

या व्हिडिओला सुमारे साडे चार लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे.