विम्बल्डन विजेती अ‍ॅँजेलिक कर्बरने तिचे प्रशिक्षक विम फिसेट्टे यांच्याबरोबरचा करार संपुष्टात आणणार असल्याचे जाहीर केले आहे.आतापर्यंत आमच्या जोडीला बऱ्यापैकी यश मिळाले आहे. त्या यशाबाबत मी समाधानी आहे. मात्र, काही भविष्यातील योजनांबाबत आमची मते अत्यंत भिन्न असल्याचे लक्षात आल्याने हा निर्णय घेतला असल्याचे कर्बरने म्हटले आहे. विम यांनी यापूर्वी किम क्लिस्टर्स, सिमोना हॅलेप आणि व्हिक्टोरिया अझोरेंका अशा एकाहून एक सरस महिला टेनिसपटूंचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. ३० वर्षीय केर्बर हिने २०१६ मध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली होती. सध्या ती तिसऱ्या स्थानी आहे.