News Flash

नेमबाजी विश्वचषक – अंजुम मुद्गीलला रायफल नेमबाजीत रौप्यपदक

भारत पदकतालिकेत पहिल्या क्रमांकावर

नेमबाजी विश्वचषक – अंजुम मुद्गीलला रायफल नेमबाजीत रौप्यपदक
रौप्यपदक पटकावणारी अंजुम मुद्गील

मेक्सिकोत सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषकात भारताची नेमबाजपटू अंजुम मुद्गीलने, ५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात रौप्यपदक पटकावलं आहे. अंजुमचं विश्वचषकातलं हे पहिलं पदक ठरलेलं आहे. चीनच्या रुईजीओ पेईने ४५५.४ गुणांसह सुवर्णपदक पटकावलं, तर चीनच्यात टिंग सूनने ४४२.२ गुणांसह रौप्यपदक मिळवलं. अंजुमने ४५४.२ गुणांची कमाई केली. या स्पर्धेतलं भारताचं हे आठवं पदक ठरलेलं आहे. आतापर्यंत भारतीय नेमबाजपटूंनी ३ सुवर्ण १ रौप्य आणि ४ कांस्यपदकांची कमाई केली आहे. ८ पदकांसह भारत सध्या नेमबाजी विश्वचषकाच्या पदकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2018 2:02 pm

Web Title: anjum moudgil wins silver in womens rifle 3 positions at issf world cup
Next Stories
1 महिला क्रिकेटपटूंच्या अल्प मानधनावरून बीसीसीआयवर संतापले ट्विपल्स
2 भारताच्या अंधूकशा आशा जिवंत
3 डी’कॉककडून माझ्या पत्नीविषयी हीन दर्जाची टिप्पणी!