News Flash

ISSF World Championship : अंकुर मित्तलचा डबल ट्रॅप नेमबाजीत सुवर्णवेध

सांघिक प्रकारातही अंकुरला कांस्यपदक

अंकुर मित्तल (संग्रहीत छायाचित्र)

जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय नेमबाजांची धडाकेबाज कामगिरी सुरुच आहे. भारताच्या अंकुर मित्तलने डबल ट्रॅप नेमबाजीत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. १५० पैकी १४० गुणांची कमाई करत अंकुरने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. स्लोवाकिया आणि चीनच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने अंकुरला चांगलीच टक्कर दिली, मात्र शूटऑफमध्ये बाजी मारत अंकुरने अव्वल स्थान कायम राखलं.

याचसोबत अंकुरने सांघिक प्रकारात शार्दुल विहान आणि मोहम्मद असबसोबत कांस्यपदकाची कमाई केली. महिलांमध्ये अंजुम मुद्गील मात्र ५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात पदकांच्या शर्यतीमधून बाहेर गेली. याचसोबत २५ मी. पिस्तुल प्रकारात भारताची मनू भाकेर दहाव्या स्थानावर फेकली गेली. आतापर्यंत या स्पर्धेतून भारताच्या दोन खेळाडूंनी ऑलिम्पिकचा कोटा मिळवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 2:56 pm

Web Title: ankur mittal wins double trap gold in issf world championship
Next Stories
1 Ind vs Eng : ….आणि ‘गब्बर’ मैदानातच भांगडा करायला लागला
2 Ind vs Eng : इशांत शर्माची कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी, पहिल्या दिवसात ८ विक्रमांची नोंद
3 US Open 2018 : निशीकोरीवर मात करुन जोकोव्हीच अंतिम फेरीत
Just Now!
X