उत्तेजक सेवनाबाबत आपण निदरेष असल्याचा दावा ऑलिम्पिक विजेती उंचउडीपटू अ‍ॅना चिचेरोव्हाने केला असून आगामी ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याची संधी द्यावी अशी मागणीही तिने केली आहे.
बीजिंग येथे २००८ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पध्रेच्या वेळी तिची उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती. या स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळविले होते, तर २०१२ मध्ये लंडन येथे तिने सुवर्णपदक पटकाविले होते. तिच्यासह काही धावपटूंची पुन्हा चाचणी घेण्यात आली. त्या वेळी चिचेरोव्हासह नऊ खेळाडू दोषी आढळल्या. चिचेरोवाने सांगितले, ‘माझ्यासाठी हे धक्कादायक वृत्त आहे. मी निदरेष असल्याचे सिद्ध करून दाखवीन.’