28 May 2020

News Flash

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : पूजा दानोळेला चौथे, 

मयूर पवारला दुसरे सुवर्ण महाराष्ट्राची आघाडी कायम

मयूर पवारला दुसरे सुवर्ण महाराष्ट्राची आघाडी कायम

गुवाहाटी : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची पदकांची आघाडी नेहमीप्रमाणे कायम राहिली आहे. महाराष्ट्राची आता २८ सुवर्ण, ३२ रौप्य आणि ५० कांस्यपदकांसह एकूण ११० पदके झाली आहेत. महाराष्ट्राच्या खालोखाल हरयाणाचा २३ सुवर्णासह (७३ पदके) दुसरा क्रमांक कायम आहे. या स्पर्धेत सायकलिंग आणि अ‍ॅथलेटिक्समध्ये राज्यातील खेळाडूंना अधिकाधिक पदके मिळत आहेत. सहाव्या दिवशीही ही सोनेरी कामगिरी कायम राहिली.

सायकलिंगमध्ये पूजा दानोळने यंदाच्या स्पर्धेतील चौथ्या सुवर्णपदकाची नोंद केली. त्यापाठोपाठ अ‍ॅॅथलेटिक्समध्ये मयूर पवारला सलग दुसरे सुवर्णपदक मिळाले.

सायकलिंगमध्ये पूजाने २०० मीटर परस्यूट शर्यतीत २ मिनिटे ४७.४१५ सेकंद वेळ दिली. स्पर्धेत पूजाने एकूण चार सुवर्ण आणि एक कांस्य अशी पाच पदके जिंकली आहेत. अ‍ॅथलेटिक्समध्ये मुलांच्या (२१ वर्षांखालील) स्प्रिंट प्रकारात साताऱ्याच्या मयूर पवारने २०० मीटर अंतराची शर्यत ११.३०६ सेकंद अशी वेळ देत जिंकली.

फुटबॉल : महाराष्ट्राची बरोबरी

मुलांच्या (२१ वर्षांखालील) गटात महाराष्ट्राला मेघालयविरुद्धची लढत १-१ बरोबरीत सोडवावी लागली. पूर्वार्धात आठव्या मिनिटालाच मिळवलेल्या आघाडीचा फायदा महाराष्ट्राला उठवता आला नाही. उत्तरार्धात सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात मिळालेल्या दुसऱ्या पेनल्टी किकवर मेघालयाने १-१ बरोबरी साधली.

हॉकी : मुली पराभूत

मुलींच्या हॉकीत उत्तर प्रदेशकडून महाराष्ट्राला (१७ वर्षांखालील) ०-४ असे मोठय़ा फरकाने पराभूत व्हावे लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2020 3:47 am

Web Title: another gold for mayur pawar in khelo india youth games 2019 zws 70
Next Stories
1 टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा : कार्लसनचा आणखी एक विश्वविक्रम
2 इंडोनेशिया बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू दुसऱ्या फेरीत
3 नेमबाजीतील अग्रस्थानात महाराष्ट्राच्या मार्गदर्शनाचे बळ!
Just Now!
X