कर्नाटक राज्यात बैलांसोबत शेतामध्ये पळण्याच्या शर्यतीत श्रीनिवास गौडा या तरुणाने ९.५५ सेकंदात १०० मी. चं अंतर पार केलं, आणि देशभरात सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. अनेक प्रसारमाध्यमांनी श्रीनिवासला भारताचा उसेन बोल्ट असंही नाव दिलं. शशी थरुर, आनंद महिंद्रा यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी सोशल मीडियावर श्रीनिवासचं कौतुक करत, केंद्रीय क्रीडा मंत्र्यांना श्रीनिवासला ऑलिम्पिकसाठी मदत करण्याचं आवाहन केलं. मात्र काही दिवसांतच याच कंबाला शर्यतीत निशांत शेट्टी नावाच्या तरुणाने श्रीनिवासचाही विक्रम मोडत सर्वोत्तम वेळ नोंदवली आहे.

रविवारी वेणूर भागात पार पडलेल्या शर्यतीमध्ये निशांत शेट्टीने ९.५१ सेकंदात १०० मी. चं अंतर पार केलं. काही दिवसांपूर्वी श्रीनिवासच्या नावे हा विक्रम जमा होता. श्रीनिवासच्या कामगिरीची दखल घेत, केंद्रीय क्रीडा मंत्रि किरेन रिजिजू यांनी त्याच्यासाठी ‘साई’ (Sports Authority of India) मध्ये ट्रायलची सोय केली होती. मात्र श्रीनिवासने आपल्याला अ‍ॅथलिट बनण्यात रस नसल्याचं सांगत पारंपरिक कंबाला शर्यत खेळण्याचा मानस असल्याचं सांगितलं. सोशल मीडियावर श्रीनिवासचं नाव चर्चेत आल्यानंतर मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांच्या हस्ते श्रीनिवासचा सत्कारही करण्यात आला होता.

अवश्य वाचा – भारताचा ‘उसेन बोल्ट’ म्हणतो, मला अ‍ॅथलीट बनण्यात रस नाही !