इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर समाजमाध्यंमावर चर्चेत आहे. १४३ ताशी प्रती किमी वेगाने टाकलेल्या त्याच्या चेंडूने बांगलादेशचा फलंदाज सौम्या सरकारच्या यष्टय़ा उडवून चेंडू सीमापार केला. शनिवारी कार्डिफ येथील सोफिया गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात २४ वर्षीय आर्चरने यंदाच्या विश्वचषकातील सर्वात वेगवान चेंडू टाकला. बांगलादेशच्या डावाच्या चौथ्या षटकाचा पहिला चेंडू यष्टीवर आदळून यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे गेला.
Have you ever seen a ball go for ‘six’ after hitting the stumps?
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 10, 2019 1:03 am
Web Title: archers ball crossed the border