News Flash

तिरंदाजीच्या वर्ल्डकपमध्ये भारताच्या ‘गोल्डन कपल’चा सुवर्णवेध!

अतानू दास आणि दीपिका कुमारी या भारतीय जोडीची नेदरलॅंड्सवर मात

अतानू दास आणि दीपिका कुमारी

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय मिश्र रिकर्व टीमने सुवर्णपदक पटकावले आहे. अतानू दास आणि दीपिका कुमारी या भारताच्या ‘गोल्डन कपल’नेही कामगिरी केली. त्यांनी नेदरलँड्सवर ५-३ असा विजय मिळवत भारताच्या झोळीत सुवर्णपदक टाकले. अतानू आणि दीपिका हे पती-पत्नी आहेत. त्यांनी मागील वर्षी ३० जूनला लग्न केले.

उपांत्य फेरीत अतानू आणि दीपिका यांनी स्पेनला ५-३ने पराभूत केले आणि उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी अमेरिकेला ६-०ने पराभूत केले होते. भारतीय महिला रिकर्व टीमनेही या स्पर्धेत इतिहास रचला आहे. दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि कोमलिका बारी या महिला संघाने अंतिम फेरीत मॅक्सिकोचा ५-१ ने पराभव केला. ऑलिम्पिकच्या शेवटच्या क्वालिफायर फेरीतील पहिल्या टप्प्यात मिळालेल्या पराभवानंतर आलेली निराशा झटकून त्यांनी हे यश मिळवले आहे. मात्र ही स्पर्धा ऑलिम्पिकसाठी पात्रता स्पर्धा नव्हती.

 

हेही वाचा – काय करावं या प्रेक्षकाचं..? चालू क्रिकेट सामन्यात महिलेशी केलं असभ्य वर्तन!

भारताच्या अभिषेक वर्माने अमेरिकेच्या क्रिस शाफचा पराभव करून विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात शनिवारी वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक पटकावले. रंगतदार अंतिम सामन्यात अभिषेकने क्रिसवर दोन गुणांनी निसटता विजय मिळवला. अभिषेकने सलग दुसरे वैयक्तिक विश्वचषक सुवर्णपदक पटकावले. याआधी २०१५च्या व्रॉकलॉ विश्वचषकात त्याने पदक प्राप्त केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 7:39 pm

Web Title: archery world cup atanu das and deepika kumari win mixed recurve team gold adn 96
Next Stories
1 काय करावं या प्रेक्षकाचं..? चालू क्रिकेट सामन्यात महिलेशी केलं असभ्य वर्तन!
2 मतदान कार्ड बनण्याच्या आधीच शफाली वर्माचा इंग्लंडमध्ये भीमपराक्रम!
3 रोहितऐवजी मयंक आणि शुबमनला ओपनिंग पाठवले गेले पाहिजे, गावसकरांनी दिला सल्ला
Just Now!
X