फुटबॉल जगताचा चमकता तारा लिओनेल मेस्सी यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर फुटबॉल प्रेमींना धक्काच बसला आहे. बार्सिलोनाकडून खुबीने कामगिरी करणाऱया मेस्सीला आपल्या राष्ट्रीय संघाकडून खेळताना अपेक्षित यश प्राप्त करता आले नाही. गेल्या तीन मोठ्या स्पर्धांमध्ये अर्जेंटिनाला पराभवाला सामोरे जावे लागले. याच नैराश्येतून मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. २९ वर्षीय मेस्सीचा हा निर्णय सर्वांनाच धक्कादायक ठरला आहे. अर्जेंटिनाचे अध्यक्ष मॉरिसियो मॅक्री यांनी मेसीला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. मेस्सीने आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन देशासाठी खेळत राहावं, असं मॅक्री यांचे म्हणणं आहे. याशिवाय, दिग्गज फुटबॉलपटू मॅराडोना यांनाही मेस्सीने आणखी काही काळ देशासाठी खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राष्ट्राध्यक्षांच्या विनंतीनंतर मेस्सी निवृत्तीचा निर्णय मागे घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

वाचा: अपूर्ण मी..

कोपा अमेरिका फुटबॉलस्पर्धेत अंतिम फेरीत चिलीविरुद्धच्या सामन्यात मेस्सीच्या अर्जेंटिनाला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभवाचा धक्का बसला. पेनल्टी शूटआऊटमध्ये मेस्सीला देखील गोल झळकावता आला नाही. त्यानंतर मेस्सी निराश झालेला पाहायला मिळाला आणि पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्याने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.

VIDEO: …आणि लिओनेल मेस्सीला अश्रू अनावर