News Flash

डी मारियाच्या दुखापतीमुळे अर्जेटिनाला धक्का

विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मजल मारण्यापासून एक पाऊल दूर असलेल्या अर्जेटिनाला मोठा धक्का बसला आहे. अव्वल खेळाडू अँजेल डी मारियाच्या मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे नेदरलँड्सविरुद्ध बुधवारी

| July 7, 2014 01:43 am

विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मजल मारण्यापासून एक पाऊल दूर असलेल्या अर्जेटिनाला मोठा धक्का बसला आहे. अव्वल खेळाडू अँजेल डी मारियाच्या मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे नेदरलँड्सविरुद्ध बुधवारी होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात डी मारियाच्या समावेशाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बेल्जियमविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी हवेत झेप घेतल्यानंतर डी मारियाच्या मांडीचे स्नायू ताणले गेले. त्यामुळे ३३व्या मिनिटानंतर त्याला मैदान सोडावे लागले. १९९०नंतर पहिल्यांदाच उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या अर्जेटिनाला डी मारियाच्या दुखापतीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. काही प्रसारमाध्यमांनी डी मारिया विश्वचषकातील उर्वरित सामन्यात खेळू शकणार नाही, असे भाकीत वर्तवले आहे.
‘‘अर्जेटिनाच्या विश्वचषक मोहिमेतील तो प्रमुख खेळाडू आहे. याआधीच आम्ही दुखापतीमुळे सर्जिओ अ‍ॅग्युरोला गमावले आहे. संघाला डी मारियाची किती गरज आहे, हे डी त्याला माहित आहे. तो लवकरच तंदुरुस्त होईल, अशी आशा आहे,’’ असे अर्जेटिनाचा आक्रमकपटू गोंझालो हिग्युएनने सांगितले.
स्वित्र्झलडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात एकमेव गोल करून डी मारियाने अर्जेटिनाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 1:43 am

Web Title: argentinas angel di maria ruled out of world cup
Next Stories
1 क्रीडा प्रक्षेपणाचा बहुरंगी बाजार
2 ब्राझील व जर्मनीला समान भाव
3 शूटआउट @ साल्वाडोर!
Just Now!
X