News Flash

अर्जुन-अरविंद जोडी ऑलिम्पिकसाठी पात्र

पुरुष लाइटवेट दुहेरी स्कल्स प्रकारातील अव्वल तीन जोड्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्या.

अर्जुन-अरविंद जोडी ऑलिम्पिकसाठी पात्र

नवी दिल्ली : अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग यांचा समावेश असलेला भारतीय नौकानयन संघ टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पुरुष लाइटवेट दुहेरी स्कल्स प्रकारात पात्र ठरला आहे. टोक्यो येथे झालेल्या आशिया/ओसिआनिया खंडीय पात्रता रेगाटा स्पर्धेच्या अंतिम शर्यतीत या जोडीला दुसरा क्रमांक मिळाला.

पुरुष लाइटवेट दुहेरी स्कल्स प्रकारातील अव्वल तीन जोड्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्या. पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकारात जकार खानला चौथा क्रमांक मिळाला. त्यामुळे त्याची ऑलिम्पिक पात्रतेची संधी हुकली.

करोनाच्या साथीमुळे भारतीय खेळाडू अन्य काही स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. त्यामुळे टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अर्जुन-अरविंद जोडीच भारताच्या आव्हानाचे प्रतिनिधित्व करतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2021 12:01 am

Web Title: arjun arvind duo qualifies for olympics akp 94
Next Stories
1 ‘आयपीएल’च्या दुसऱ्या टप्प्यासाठी तीन पर्याय
2 मलिक ऑलिम्पिक पात्रतेच्या उंबरठय़ावर
3 सायना, श्रीकांतच्या ऑलिम्पिक पात्रतेला फटका?
Just Now!
X