टोक्यो : भारतीय नौकानयनपटू अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग यांनी रविवारी पुरुषांच्या नौकानयन स्पध्रेत लाइटवेट डबल स्कल्स रेपीचेजद्वारे उपांत्य फेरी गाठली. सी फॉरेस्ट वॉटरवे येथे झालेल्या या स्पध्रेत अर्जुन-अरविंद या भारतीय जोडीने ६:५१.३६ अशी वेळ नोंदवून तिसरा क्रमांक पटकावला. पोलंडच्या जेर्झी कोवालस्की आणि आर्टर मिकोलाजशेवस्की यांनी ६:४३.४४ वेळ देत पहिला, तर स्पेनच्या होर्टा पोम्बो आणि मॅनेल बालास्टेग्यू जोडीने ६:४५.७१ वेळेसह दुसरा क्रमांक मिळवला. शनिवारच्या शर्यतीत अर्जुन-अरविंद जोडीने पाचवा क्रमांक मिळवला होता. या स्पध्रेची उपांत्य फेरी २७ जुलैला होणार आहे.

नौकानयन हा क्रीडा प्रकार देशात फारसा लोकप्रिय नाही. परंतु भारताला या खेळात सर्वोत्तम स्थान आपण मिळवून देऊ, हा विश्वास आमच्या प्रशिक्षकाने दिला. त्याने आखलेल्या रणनीतीनुसार आम्ही कामगिरी केली.

-अर्जुन लाल जाट