भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने पुन्हा एकदा आपली चमक दाखवली आहे. मुंबईकडून खेळत असताना 19 वर्षाखालील कूचबिहार करंडकात अर्जुनने 5 बळी घेतले. अर्जुनने आपल्या भेदक माऱ्याने दिल्लीचा निम्मा संघ तंबूत धाडला.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईने 453 धावांचा डोंगर रचला. तिसऱ्या दिवसाअखेरीस दिल्लीने 9 गड्यांच्या मोबदल्यात 354 धावा केल्या आहेत. दिल्लीचा संघ अद्यापही सामन्यात 59 धावांनी मागे आहे. मुंबईकडून सलामीवीर दिव्यांशने 211 धावांची खेळी केली.

अर्जुनने 98 धावा देत दिल्लीच्या संघाचा कर्णधार आयुष बादोनी, वैभव कांडपाल, यष्टीरक्षक गुलझार सिंह संधू, ऋतिक शोकीन, प्रशांत कुमार भाटी या फलंदाजांना माघारी धाडलं. अर्जुन हा 19 वर्षाखालील मुंबई संघाचा महत्वाचा गोलंदाज आहे. या आधी अर्जुनने 19 वर्षाखालील भारतीय संघाकडून श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामना खेळला आहे.