27 January 2021

News Flash

मुंबईच्या संघात अर्जुनचा समावेश

मुंबई निवड समितीचे अध्यक्ष सलील अंकोला यांनी यासंबंधी अधिकृत माहिती दिली.

युवा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरची आगामी सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईच्या संघात निवड करण्यात आली. करोना साथीच्या पाश्र्वभूमीवर एकूण २२ खेळाडूंना संघात सहभागी करण्याच्या पर्यायाचा अवलंब करताना अर्जुनसह कृतिक हणंगवाडीलाही मुंबईने संघात स्थान दिले आहे.

मुंबई निवड समितीचे अध्यक्ष सलील अंकोला यांनी यासंबंधी अधिकृत माहिती दिली. ‘‘मुश्ताक अली स्पर्धेसाठी सुरुवातीला आम्ही मुंबईचा २० जणांचा चमू जाहीर केला होता. परंतु करोनाच्या पाश्र्वभूमीवर खबरदारी म्हणून २२ खेळाडूंची निवड करण्याचा पर्याय असल्याने अर्जुन तेंडुलकर आणि कृतिक हणंगवाडी यांचा मुंबईच्या संघात समावेश करण्यात आला आहे,’’ असे अंकोला म्हणाले. २१ वर्षीय अर्जुनला प्रथमच मुंबईच्या वरिष्ठ संघात स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी अर्जुनने मुंबईच्या विविध वयोगटाताली संघांचे प्रतिनिधित्व केले असून भारतीय संघासाठी त्याने नेटमध्येही गोलंदाजी केली आहे.

मुश्ताक अली स्पर्धेला १० जानेवारीपासून प्रारंभ होणार असून सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील मुंबईचा संघ सर्व साखळी सामने वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. मुंबईच्या संघातून श्रेयस अय्यरने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे यांच्यावर मुंबईच्या वेगवान माऱ्याची भिस्त असून फलंदाजीत सूर्यकुमारवर मदार आहे.

कृणाल, हूडाचा बडोदा संघात समावेश

बडोदा : अष्टपैलू खेळाडू कृणाल पंडय़ा आणि दीपक हूडा यांचा १० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० स्पर्धेसाठी बडोदा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर केदार देवधर आणि विष्णू सोलंकी यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशनने आपल्या संकेतस्थळावर याबाबतची घोषणा केली आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज लुकमान मेरिवाला तसेच डावखु?? फिरकीपटू भार्गव भट हे दोन नवे चेहरे संघात असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2021 1:05 am

Web Title: arjun tendulkar in mumbais senior squad mppg 94
Next Stories
1 क्रिकेट सम्राज्ञी! – एलिस पेरी
2 IND vs AUS: रोहित शर्मासह पाच भारतीय क्रिकेटपटू आयसोलेशनमध्ये, कारण…
3 ‘स्टेन’गन थंडावली; यंदा आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय
Just Now!
X