News Flash

अर्जुन तेंडुलकर SOLD… जाणून घ्या कोणत्या संघानं, कितीला घेतलं विकत

लिलावाच्या अखेरच्या फेरीत अर्जुन तेंडुलकरला खरेदी केलं

(संग्रहित छायाचित्र)

आयपीएलच्या यंदाच्या लिलावात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याला मुंबई इंडियन्स संघानं आपल्या चमूमध्ये सहभागी केलं आहे. पहिल्या फेरीत अर्जुन तेंडुलकर याच्यावर एकाही संघ मालकानं बोली लावली नव्हती. मात्र, मुंबईनं लिलावाच्या अखेरच्या फेरीत अर्जुन तेंडुलकरला खरेदी केलं. अर्जुन तेंडुलकरला त्याच्या मूळ किंमतीत म्हणजेच २० लाख रुपयांना खरेदी केलं आहे.

अर्जुन तेंडुलकर यानं नुकतीच झालेल्या मुश्ताक अली चषकादरम्यान मुंबईच्या संघाकडूव पदार्पण केलं होतं. यंदा पहिल्यांदाच अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या मैदानात उतरला आहे. अर्जुन तेंडुलकर डाव्य हाताचा वेगवान गोलंदाज आहे. तर वेळप्रसंगी विस्फोटक फलंदाजी करु शकतो. अर्जुन तेंडूलकर तळाला संघासाठी मोठे फटके मारु शकतो.

अर्जुनने नुकत्याच झालेल्या पोलीस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू क्षमतेची चुणूक दाखवून दिली होती. अर्जुनने एकाच षटकात ५ षटकार लगावत ३१ चेंडूत ७७ केल्या. तसेच तीन महत्वाचे बळीही मिळवले. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत अर्जुन तेंडुलकरला संघात स्थान मिळणार का? याकडे मुंबईच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2021 8:24 pm

Web Title: arjun tendulkar joins mipaltan nck 90
टॅग : IPL 2021
Next Stories
1 IPL Auction : अखेर भज्जीला ‘या’ संघानं घेतलं ताफ्यात
2 पुजारा कसोटीवर खरा उतरला; या संघाने लाखो रुपयांना घेतलं विकत
3 IPL Auction : कृष्णप्पा गौतमने केला विक्रम; चेन्नईने घेतलं विकत
Just Now!
X