News Flash

“महाराष्ट्रीय असल्यानं माझ्यावर अन्याय झालाय”, अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडू करतोय शेती

'या' खेळाडूला महाराष्ट्र शासनाच्या सर्वोत्कृष्ट शिवछत्रपती पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलंय.

महाराष्ट्राचा अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडू दत्तू भोकनळ करतोय शेती

रोइंग म्हणजेच नौकानयन स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राच्या दत्तू भोकनळवर आज शेती करण्याची वेळ आली आहे. हे वाचायला विचित्र वाटत असले तरी हे कटू सत्य आहे. २०२०मध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त भोकनळने आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले आहे. इतकेच नव्हे तर त्याने फेडरेशनविरूद्ध भेदभावाचे गंभीर आरोप केले. महाराष्ट्रीय असल्याने माझ्यावर अन्याय झाला, असे दत्तूने सांगितले.

दत्तू म्हणाला, ”माझ्यापेक्षा जास्त वेळ घेणाऱ्या खेळाडूंना संधी दिली गेली. मला पात्रता फेरीत भाग घेण्याची परवानगीदेखील नव्हती, पण कोणतेही कारण न सांगता मला शिबिरातून काढून टाकण्यात आले.” २०१७मध्ये दत्तुला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

 

 

हेही वाचा – आयर्लंडला दणका देत क्विंटन डी कॉकनं मोडला धोनीचा विक्रम!

दत्तू भोकनळची कामगिरी

दत्तुला पात्रता फेरीत स्थान मिळवता आले नाही आणि काही दिवसांपूर्वीच त्याने सैन्यात नायब सुभेदार पदाचा राजीनामाही दिला आहे. २०१४ मध्ये दत्तूने राष्ट्रीय रोइंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण पदके जिंकली होती. २०१५मध्ये एशियन चॅम्पियनशिपमध्ये दत्तूने रौप्य पदक आणि त्यानंतरच्या वर्षी चीनमध्ये झालेल्या १६व्या आशियाई रोइंग स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. या कामगिरीच्या जोरावर त्याला २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. भारताकडून रोइंग स्पर्धेत खेळणारा तो एकमेव खेळाडू होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 7:40 pm

Web Title: arjuna award winning rowing player dattu bhokanal is doing farming now adn 96
Next Stories
1 आयर्लंडला दणका देत क्विंटन डी कॉकनं मोडला धोनीचा विक्रम!
2 VIDEO : नादच खुळा..! विंडीजच्या खेळाडूनं घेतलेला झेल एकदा पाहाच
3 IND vs SL 1st ODI : कुठे आणि कधी पाहता येणार सामना?
Just Now!
X