भाऊ-भाऊ एकत्र खेळण्याची क्रिकेटमध्ये अनेक उदाहरणे आहेत, मात्र काका-पुतण्या एकसाथ एका संघात असण्याचा अनोखा योगायोग जुळून आला आहे. वासिम जाफर आणि त्याचा १४ वर्षीय पुतण्या अरमान जाफर या दोघांचा मुंबईच्या रणजी संभाव्य संघात समावेश करण्यात आला आहे.
रिझवी स्प्रिंगफिल्ड शाळेतर्फे खेळताना अरमानने प्रतिष्ठेच्या हॅरिस ढाल स्पर्धेच्या अंतिम लढतीत माटुंगा जिमखानाविरुद्ध ४७३ धावांची मॅरेथॉन खेळी केली होती. १६ वर्षांखालील मुंबईच्या संघाचा नियमित भाग असणाऱ्या अरमानला आता मास्टरब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर, आणि काका वासिम जाफर यांच्याबरोबरीने सराव करण्याची संधी मिळणार आहे. ठरणार आहे.
मुंबईचा संभाव्य संघ : सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, वासिम जाफर, अरमान जाफर, झहीर खान, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, अभिषेक नायर, सूर्यकुमार यादव, इक्बाल अब्दुल्ला, आदित्य तरे, हिकेन शाह, क्षेमल वायंगणकर, कौस्तुभ पवार, सिद्धेश लाड, विशाल दाभोळकर, रमेश पोवार, धवल कुलकर्णी, जावेद खान, शार्दुल ठाकूर, सौरभ नेत्रावळकर, अखिल हेरवाडकर, सर्फराझ खान, बलविंदर सिंग संधू (कनिष्ठ), सागर केरकर, सुफियान शेख, सर्वेश दामले, अतुल सिंग, प्रतीक दाभोळकर आणि आविष्कार साळवी.