26 September 2020

News Flash

आर्मस्ट्राँगच्या शर्यतीला चाहत्यांकडून विरोधाची शक्यता

उत्तेजक द्रव्यसेवनात दोषी ठरलेल्या लान्स आर्मस्ट्राँगने स्वतंत्ररीत्या टूर डी फ्रान्स सायकल शर्यत सुरू करण्याचा प्रयत्न केला तर त्याला चाहत्यांकडून तीव्र विरोध दर्शविला जाईल, असे आंतरराष्ट्रीय

| April 23, 2015 04:13 am

उत्तेजक द्रव्यसेवनात दोषी ठरलेल्या लान्स आर्मस्ट्राँगने स्वतंत्ररीत्या टूर डी फ्रान्स सायकल शर्यत सुरू करण्याचा प्रयत्न केला तर त्याला चाहत्यांकडून तीव्र विरोध दर्शविला जाईल, असे आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघाचे (यूसीआय) अध्यक्ष ब्रायन कुकसन यांनी म्हटले आहे. उत्तेजक सेवनामुळे आर्मस्ट्राँगला टूर डी फ्रान्स शर्यतीची सात विजेतेपदे गमवावी लागली आहेत. तो कर्करोगग्रस्तांच्या मदतीसाठी इंग्लंडचा फुटबॉलपटू जिऑफ थॉमस याच्या सहकार्याने या शर्यतीच्या मार्गावर एक दिवसाची शर्यत स्वतंत्ररीत्या सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याबाबत कुकसन यांनी सांगितले, ‘‘आर्मस्ट्राँगने सायकलिंगच्या चाहत्यांची सपशेल फसवणूक केली आहे. त्यामुळे त्याने शर्यत आयोजित केली तर त्यास चाहत्यांकडून तीव्र विरोध सहन करावा लागेल. कर्करोगग्रस्तांसाठी अन्य अनेक मार्गानी निधी उभारणे शक्य आहे, त्यामुळे आर्मस्ट्राँग व थॉमस यांनी सायकल शर्यतीचा विचार सोडून द्यावा.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 4:13 am

Web Title: armstrong risks angry welcome on tour charity ride
Next Stories
1 वेस्ट इंडिजची संथ सुरुवात
2 आशियाई बॅडमिंटन स्पर्धा : कश्यपची विजयी सलामी
3 पाकिस्तानमध्ये क्रिकेटची घरवापसी
Just Now!
X