08 March 2021

News Flash

विराटला अटक करा; न्यायालयात याचिका दाखल

जाणून घ्या नक्की आहे तरी काय प्रकरण

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला अटक करण्यात यावी अशी एक याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. विराट आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना यांना अटक करण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. ऑनलाइन गॅम्बलिंगची (जुगाराची) जाहिरात हे दोनही अभिनेते करत असून अशा प्रकारांनी जुगाराला प्रोत्साहन दिलं जात असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.

चेन्नईस्थित एका वकिलाने ही याचिका दाखल केली आहेत. विराट कोहली ऑनलाईन जुगाराची जाहिरात करत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. युवकांमध्ये या अ‍ॅपचे व्यसन वाढत चालले आहे. त्यामुळे या ऑनलाईन जुगार खेळण्याच्या सर्वच अ‍ॅपवर बंदी घालावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात केली आहे. तसेच विराट कोहली, तमन्ना हे सेलिब्रिटी अशा अ‍ॅप्सची जाहीरात करून तरूणांची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे या दोघांना अटक करण्यात यावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

याचिकाकर्त्याने या याचिकेत एका कर्जबाजारी तरूणाचा दाखला दिला आहे. एका तरूणाने या ऑनलाईन अ‍ॅपसाठी पैसे उसने घेतले होते. पण तो तरूण ते पैसे परत करू न शकल्यानं त्याने आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा दाखला याचिकेत देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 3:47 pm

Web Title: arrest virat kohli as chennai based lawyer files petition in the madras high court seeking as virat promoting online gambling game vjb 91
Next Stories
1 IPLची पाकिस्तान सुपर लीगशी तुलना केल्यास… – वासिम अक्रम
2 हार्दिक-नताशाला सचिनच्या खास शुभेच्छा, म्हणाला…
3 ENG vs IRE : विजय इंग्लंडचा पण चर्चा आयर्लंडच्या कर्टीसची, कारण…
Just Now!
X