News Flash

गतविजेत्या बार्सिलोनासमोर आर्सेनलचा अडथळा

उप-उपांत्यपूर्व फेरीच्या वेळापत्रकात अनेक मात्तबर संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

| December 15, 2015 05:24 am

उप-उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक जाहीर
युरोपियन फुटबॉल महासंघाच्या (युएफा) चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या जेतेपदाची शर्यत अधिक चुरशीची झाली आहे. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या स्पध्रेच्या
उप-उपांत्यपूर्व फेरीच्या वेळापत्रकात अनेक मात्तबर संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे यंदाचा चषक कोणाच्या खात्यात जमा होईल, याचा अंदाच बांधणे अवघड झाले आहे.
गतवर्षी मोठय़ा दिमाखात चॅम्पियन्स लीगचा चषक उंचावणाऱ्या बार्सिलोनासमोर बलाढय़ आर्सेनलचे आव्हान असणार आहे. तब्बल दहा वर्षांनंतर हे उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळणार आहे. २०१०-११ च्या चॅम्पियन्स लीग स्पध्रेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत बार्सिलोनाने २-१ अशा फरकाने आर्सेनलचा पराभव केला होता. याची पुनरावृत्ती करण्यात बार्सिलोना यशस्वी
होतो, की आर्सेनल वचपा
काढतो, हे पाहणे औत्सुक्याचे
आहे.
या व्यतिरिक्त चेल्सीविरुद्ध पॅरिस सेंट जर्मेन यांच्याही सामन्याची उत्सुकता आहे. चॅम्पियन्स लीगचे दोन माजी विजेते युव्हेंटस आणि बायेर्न म्युनिक आमनेसामने आले असून दहा वेळा चॅम्पियन्स लीगचा चषक उंचावणाऱ्या रिअल माद्रिदला एएस रोमाचे आव्हान पेलावे लागेल. १६ फेब्रुवारी ते १५ मार्च २०१६ या कालावधीत हे उप-उपांत्यपूर्व फेरीच्या लढती रंगणार आहेत.
उप-उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक
पॅरिस सेंट जर्मेन विरुद्ध चेल्सी
बेनफिका विरुद्ध जेनीट सेंट पिटर्सबर्ग
जेंट विरुद्ध वुल्फ्सबर्ग
रोमा विरुद्ध रिअल माद्रिद
आर्सेनल विरुद्ध बार्सिलोना
युव्हेंटस विरुद्ध बायेर्न म्युनिक
पीएसव्ही इयनडोव्हेन विरुद्ध अ‍ॅटलेटिको माद्रिद
डायनामो विरुद्ध मँचेस्टर सिटी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2015 5:03 am

Web Title: arsenal barrier in front of defending champion barcelona
Next Stories
1 ट्वेन्टी- २० विश्वचषकासाठी मोहालीला हिरवा कंदील
2 मतभेद विसरून जोश्ना व दीपिका पुन्हा एकत्र
3 महाराष्ट्राच्या विजयाची हॅट्ट्रिक
Just Now!
X