07 March 2021

News Flash

स्पॅनिश फुटबॉलपटू या बॉलीवूड अभिनेत्रीला करतोय डेट

ईशा गुप्ता ही आर्सेनल संघाची मोठी चाहती राहिली आहे

इंग्लिश प्रिमिअर लीगमध्ये हेक्टर हा सुप्रसिद्ध आर्सेनल क्लबकडून खेळतो

स्पॅनिश फुटबॉलपटू हेक्टर बेलेरिन सध्या एका बॉलीवूड अभिनेत्रीवर फिदा झाला आहे. हेक्टर नुकताच बॉलीवूड अभिनेत्री ईशा गुप्ता हिच्यासोबत दिसून आला. इंग्लिश प्रिमिअर लीगमध्ये हेक्टर हा सुप्रसिद्ध आर्सेनल क्लबकडून खेळतो. आर्सेनलने नुकतेच या स्पर्धेत चेल्सिला ३-० ने पराभूत केले. ईशा गुप्ता ही आर्सेनल संघाची मोठी चाहती राहिली आहे. ईशा आर्सेनल आणि चेल्सिया संघाच्या सामन्यात हेक्टरच्या प्रोत्साहन वाढवताना दिसली होती. इतकेच नाही, तर ईशाने अनेकदा आर्सेनल क्लबचे टी-शर्ट परिधान करून आपली छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. हेक्टर आणि ईशा काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये डेटवर गेल्याचेही दिसून आले होते. दोघांनी हॉटेलमध्ये तीन तासांहून अधिक काळ एकमेकांसोबत वेळ व्यतित केला. दोघांची पहिली भेट ही लंडनच्या डर्बी येथे झाली होती. येथेच त्यांचे सूत जुळल्याचे सांगितले जात आहे.

isha3_1476349948

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 8:41 pm

Web Title: arsenals hector bellerin and bollywood actress esha gupta spotted in london
Next Stories
1 एकदिवसीय सामन्यांसाठीही आमची भूमिका आक्रमकच- रहाणे
2 महाराष्ट्राच्या स्वप्निल आणि अंकितची विक्रमी भागीदारी
3 ‘भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने व्हायला हवेत’
Just Now!
X