इंग्लंडविरुद्धच्या कामगिरीनंतर रवींद्र जडेजाच्या अष्टपैलूत्वाची भारताचा माजी फलंदाज आणि विश्लेषक संजय मांजरेकरने खिल्ली उडवली होती. परंतु जडेजाने मी तुझ्यापेक्षा दुप्पट सामने खेळलो आहे, असा दावा करीत त्याला प्रत्युत्तर दिले होते. मग श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याचे समालोचन करतानाही मांजरेकरने जडेजावर निशाणा साधला होता. मंगळवारच्या न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यासाठी मांजरेकरने ‘ट्विटर’वर भारताचा ११ जणांचा संघ जाहीर करताना जडेजाला स्थान दिले नाही. परंतु त्याच्या जागी केदार जाधवला स्थान दिले. यासाठी त्याने भारतीय फिरकी गोलंदाजांची न्यूझीलंडविरुद्धची सांख्यिकी मांडली. परंतु समाजमाध्यमांवर मांजरेकरच्या या सूचनेबाबत जोरदार टीका झाली. एका व्यक्तीने भारताच्या प्रत्येक खेळाडूच्या नावापुढे जडेजा असे लिहून मांजरेकरला उत्तर दिले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 10, 2019 1:07 am