संपूर्ण देश सध्या करोना विषाणूशी लढा देण्यासाठी एकवटला आहे. समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्ती आपापल्या परीने करोनाविरुद्ध लढ्यात सरकारची मदत करत आहे. देशातले क्रीडापटू आणि क्रीडा संघटनाही यासाठी मैदानात उतरल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांसाठी करोनाशी सामना करण्याकरता, ३ आठवड्यांसाठी लॉक डाऊनची घोषणा केली. लोकांनी रस्त्यांवर अनावश्यक गर्दी करु नये यासाठी प्रत्येक राज्यात पोलिस यंत्रणा दिवस-रात्र पहारा देत आहेत. असं असलं तरीही काही भागांमध्ये लोकं शासनाचा आदेश धुडकावत रस्त्यावर आलेली पहायला मिळत आहेत.

बीसीसीआयने आपल्या चाहत्यांना करोनाशी लढा देण्यासाठीच्या युक्ती अत्यंत रंजक पद्धतीने समजावून सांगितल्या आहेत. पाहूयात काय म्हणतयं बीसीसीआय…

घरात रहायचं, बाहेर पडायचं नाही…

बाहेर पडणार असाल तर सुरक्षित अंतर बाळगा…

तुमचे दोन्ही हात स्वच्छ राहतील याची काळजी घ्या…

घरकामामध्ये मदत करा…

महत्वाची प्रत्येक बातमी किंवा सुचना सर्वांना सांगा…

अशा पद्धतीने आपण सर्व मिळून करोनावर मात करु…

जगभरात करोना विषाणूने थैमान घातलेलं आहे. चीन, इटली आणि युरोपातील काही देशांना या विषाणूचा सर्वाधित फटका बसला आहे. भारतामध्येही करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, काही लोकांना यामुळे आपले प्राणही गमवावे लागले आहेत. त्यामुळे आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंनी दिलेल्या टिप्स पाहून चाहते घरात थांबतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे,