भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. Star Sports वाहिनीच्या एका कार्यक्रमात इरफानने आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीची अखेर करत असल्याचं जाहीर केलं. इरफानने आतापर्यंत १२० वन-डे, २९ कसोटी आणि २४ टी-२० सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
अवश्य वाचा – टीम इंडियाचा ‘पठाण’ अखेरीस निवृत्त
२००६ साली पाकिस्तान दौऱ्यात इरफान पठाणने कसोटी सामन्यात हॅटट्रीक नोंदवत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडली. इरफानने सलमान बट, युनूस खान आणि मोहम्मद युसूफ या फलंदाजांना माघारी धाडलं होतं. पाहा इरफानच्या या अनोख्या कामगिरीचा व्हिडीओ…
मात्र सुरुवातीला लागलेल्या धक्क्यांनतर पाकिस्तानी संघाने या सामन्यात चांगलं पुनरागमन केलं होतं. पाकिस्तानने हा सामना ३४१ धावांनी जिंकला होता. एक नजर इरफान पठाणच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर…
- २९ कसोटी – १०० बळी (सर्वोत्तम कामगिरी – ७/५९)
- १२० वन-डे – १७३ बळी (सर्वोत्तम कामगिरी – ५/२७)
- २४ टी-२० – २८ बळी (सर्वोत्तम कामगिरी – ३/१६)
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 4, 2020 6:06 pm