News Flash

इंग्लंडसाठी ‘ब्रॉड’ दिवस

स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक आणि अचूक माऱ्याच्या जोरावर इंग्लंडला अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी लढतीच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाला ‘बॅकफूट’वर ढकलण्यात यश आले.

| November 22, 2013 03:38 am

स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक आणि अचूक माऱ्याच्या जोरावर इंग्लंडला अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी लढतीच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाला ‘बॅकफूट’वर ढकलण्यात यश आले. यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिन आणि मिचेल जॉन्सन यांनी सातव्या विकेटसाठी रचलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला दिवसअखेर ८ बाद २७३ अशी मजल मारता आली.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण ब्रॉडच्या भेदक माऱ्यापुढे त्यांना अपेक्षेनुरूप धावसंख्या उभारता आली नाही. ब्रॉडने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या चारही फलंदाजांना भेदक मारा करत अवघ्या ८३ धावांमध्ये तंबूत धाडले. त्यानंतर पदार्पण करणारा जॉर्ज बेली (३) आणि स्टिव्हन स्मिथ (३१) झटपट बाद झाल्याने त्यांची ६ बाद १३२ अशी अवस्था झाली. ऑस्ट्रेलियाचा डाव आता गडगडणार असे वाटत असतानाच हॅडिन आणि जॉन्सन या तळाच्या फलंदाजांनी सातव्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी रचत संघाला अडीशचे धावांचा पल्ला गाठून दिला. जॉन्सनने ६ चौकार आणि २ षट्कारांच्या जोरावर ६४ धावांची अमूल्य खेळी साकारली, तर हॅडिनने डाव सावरत ७ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ७८ धावांची खेळी साकारत संघाच्या धावसंख्येला चांगला आकार दिला.
ब्रॉडने पाच बळी मिळवत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले, तर जेम्स अँडरसनने दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ९० षटकांत ८ बाद २७३ (ब्रॅड हॅडिन नाबाद ७८, मिचेल जॉन्सन ६४; स्टुअर्ट ब्रॉड ५/६५)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 3:38 am

Web Title: ashes 2013 the ashes five star stuart broad silences brisbane boos
Next Stories
1 एमएसएसएकडून पृथ्वी शॉ याला हॅरिस व गाइल्स शिल्डची प्रतिकृती देणार
2 संक्षिप्त : वॉवरिंका चेन्नई टेनिस स्पर्धेत खेळणार
3 लवकरच भारताकडून ‘डब्यूडब्यूई’मध्ये दिसणार ‘नवा खली’!
Just Now!
X