20 September 2019

News Flash

Ashes 2019: ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडचा धुव्वा, ६७ धावांवर अख्खा संघ गारद

ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज जोश हेजलवूड याने ३० धावांत पाच गडी बाद केले

अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाने फक्त ६७ धावांत इंग्लंडचा संघ गारद केला आहे. पावसाच्या वारंवार व्यत्ययामुळे इंग्लंड कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा बराच वेळ वाया गेला होता. पण दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज जोश हेजलवूड याने ३० धावांत पाच गडी बाद केले.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. इंग्लंडच्या गोलंदाजांनीही दमदार कामगिरी केल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाची फलंदाजी ढेपाळली होती. मात्र वॉर्नर आणि लॅबूशेन यांनी तिसऱ्या गडय़ासाठी १११ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १७९ धावा केल्या.

इंग्लंड संघ फक्त ६७ धावा करु शकल्याने ११२ धावांनी पिछाडीवर आहे. इंग्लंडकून जोए डेनली हा एकमेव खेळाडू राहिला जो दोन अंकी धावसंख्या करु शकला. डेनलीने १२ धावा केल्या. इंग्लंडचा कर्णधार जोए रुट भोपळाही फोडू शकला नाही. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया १-० ने आघाडीवर आहे.

First Published on August 23, 2019 7:34 pm

Web Title: ashes 2019 england all out on 67 against australia sgy 87