मँचेस्टर : स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबूशेन यांनी अर्धशतके झळकावून साकारलेल्या शतकी भागीदारीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ३ बाद १७० अशी मजल मारली. पहिल्या दिवसाचा बहुतांश खेळ हा पावसामुळे वाया गेला.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. यानंतर डेव्हिड वॉर्नर (०) आणि मार्कस हॅरिस (१३) यांना स्टुअर्ड ब्रॉडने तंबूची वाट दाखवल्यामुळे ऑस्ट्रेलियाची २ बाद २८ अशी केविलवाणी अवस्था झाली. परंतु लॅबूशेन (६७) आणि स्मिथ (खेळत आहे ६०) यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ११६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. क्रेग एव्हर्टनने लॅबूशेनला बाद करून ही जोडी फोडली.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ४४ षटकांत ३ बाद १७० (मार्नस लॅबूशेन ६७, स्टीव्ह स्मिथ खेळत आहे ६०; स्टुअर्ट ब्रॉड २/३५)