25 February 2020

News Flash

अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट मालिका : आता ऑस्ट्रेलियाचे मालिका विजयाचे लक्ष्य

ऑस्ट्रेलियाच्या यशोमालिकेत वेगवान माऱ्याची भूमिकासुद्धा महत्त्वाची आहे

एएफपी, लंडन

स्टीव्ह स्मिथची झुंजार फलंदाजी इंग्लंडसाठी डोकेदुखी ठरते आहे. अ‍ॅशेस चषक आपल्याकडे राखण्यात यश मिळवणारा ऑस्ट्रेलियाचा संघ २००१नंतर प्रथमच मालिका विजयासाठी आसुसला आहे.

टिम पेनच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या संघाने रविवारी ओल्ड ट्रॅफर्डवर चौथी कसोटी जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली आहे. आता मालिकेत बरोबरी साधण्यासाठी विश्वविजेत्या इंग्लंडला स्मिथला जेरबंद करण्यासाठी योग्य रणनीती आखावी लागणार आहे.

चेंडू फेरफारप्रकरणी एक वर्षांची बंदी भोगल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात परतणाऱ्या स्मिथने पाच डावांत १३४च्या धाव सरासरीने एकूण ६७१ धावा केल्या आहेत. माजी कर्णधार स्मिथने तीन शतके आणि दोन अर्धशतकांसह जागतिक कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत अग्रस्थान काबीज केले आहे. मँचेस्टरच्या कसोटीत त्याने द्विशतक साकारले होते. मार्नस लॅबूशेन हा आणखी एकमेव फलंदाज सातत्याने फलंदाजी करीत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या यशोमालिकेत वेगवान माऱ्याची भूमिकासुद्धा महत्त्वाची आहे: जोश हॅझलवूड आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या पॅट कमिन्स यांनी मिळून एकूण ४२ बळी मिळवले आहेत.

* सामन्याची वेळ : दुपारी ३.३० वा.

*  थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स.

First Published on September 12, 2019 2:40 am

Web Title: ashes 2019 england vs australia now the target of australia to series win zws 70
Next Stories
1 युरो पात्रता फुटबॉल स्पर्धा : रोनाल्डोच्या हॅट्ट्रिकमुळे पोर्तुगाल विजयी
2 अल्टिमेट खो-खो लीगचा थरार फेब्रुवारीमध्ये!
3 भारत ‘अ’ संघ विजयाच्या उंबरठय़ावर
Just Now!
X