29 January 2020

News Flash

स्मिथ हेल्मेट प्रकरण : क्रिकेट ऑस्ट्रेलिया लवकरच घेणार मोठा निर्णय

आर्चरचा वेगवान चेंडू स्मिथच्या मानेवर आदळल्यामुळे त्याला सामन्यातून माघार घ्यावी लागली...

स्टीव्ह स्मिथच्या जागी बदली खेळाडू म्हणून आलेल्या मार्नस लाबुशेनने केलेल्या झुंजार अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धची दुसरी अ‍ॅशेस कसोटी अनिर्णित राखण्यात यश मिळवले. बेन स्टोक्सने साकारलेल्या शतकामुळे इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला २६८ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात जोफ्रा आर्चरच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाची आघाडीची फळी ढेपाळली. परंतु लाबुशेन (५९) आणि ट्रेव्हिस हेड यांच्या (४२*) कामगिराच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सामना संपेपर्यंत ६ बाद १५४ धावा करत सामना वाचवला.

या सामन्यात अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ याला इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचा चेंडू लागला. त्यामुळे स्टीव्ह स्मिथला मैदान सोडावे लागले, त्यानंतर पुन्हा तो जिद्दीने पुन्हा मैदानात उतरला खरा पण तो लगेचच बाद झाला. त्याने ९२ धावांची खेळी केली. यानंतर आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

२०१४ मध्ये शेफील्ड शिल्ड सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिल ह्युजच्या डोक्याला चेंडू लागून त्याचा मृत्यू झाला होता. ह्युजच्या मृत्यूनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मैदानावर खेळताना खेळाडूंच्या सुरक्षेवर भर दिला. ऑस्ट्रेलियामध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मानेच्या सुरक्षेसाठी स्टेम गार्ड वापरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. मात्र त्याची सक्ती करण्यात न आल्यामुळे अ‍ॅशेस मालिकेत स्टीव्ह स्मिथ स्टेम गार्ड न वापरता मैदानात उतरला आणि तो अपघात घडला. त्यामुळे आता स्टेम गार्डचा वापर करणे अनिवार्य करण्यात आला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे विज्ञान खेळ आणि चिकित्सा प्रमुख अलेक्स कोंटोरिस एक वर्ष याचा वापर करून पाहणार आहे. त्यानंतर या हेल्मेटची सक्ती करण्यात येईल. ICC ही याचा वापर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करू शकते.

मानेचे रक्षण करण्यासाठीचे ‘स्टेम गार्ड’

 

दरम्यान, आर्चरचा वेगवान चेंडू स्मिथच्या मानेवर आदळला, त्यानंतर मार्नस लाबुशेनला संघात सामिल करण्यात आले. ICC च्या बदललेल्या नियमानुसार पहिल्यांदाच क्रिकेटपटूच्या रिप्लेसमेंटचा वापर करण्यात आला. हा नियमही आधी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने लागू केला होता. त्यामुळे जसा पर्यायी खेळाडूचा नियम लागू केला, तसाच आता हा नियम आयसीसीच्या वतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरण्यात येऊ शकतो.

First Published on August 19, 2019 1:35 pm

Web Title: ashes 2019 steve smith jofra archer ball hit on neck steam guard cricket australia vjb 91
Next Stories
1 पुजारा, रोहितची दमदार फलंदाजी; इशांत, उमेशचा भेदक मारा
2 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ११ वर्षांच्या प्रवासाबद्दल विराट म्हणतो…
3 विंडिजमध्ये भारतीय संघावर दहशतवादी हल्ल्याची अफवाच – BCCI
Just Now!
X