News Flash

पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा विजय

३१ वर्षांत ब्रिस्बेनला झालेल्या आठ सामन्यांमध्ये इंग्लंडला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही.

डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांची नाबाद अर्धशतके

ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेन क्रिकेट मैदानावरील पहिल्या कसोटी सामन्यात १० विकेट्स राखून शानदार विजय साजरा केला आणि अ‍ॅशेस कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली.

सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांनी १७३ धावांची नाबाद भागीदारी करून विजयाचे लक्ष्य सामन्याच्या अखेरच्या दिवशी उपाहाराआधीच पार केले. या जोडीने विजयी आव्हान पेलताना सर्वोच्च नाबाद सलामीची भागीदारी रचण्याचा ८७ वर्षांचा विक्रम मोडीत काढला. वॉर्नरने ११९ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद ८७ धावा केल्या, तर बॅनक्रॉफ्टने १८२ चेंडूंत १० चौकार आणि एका षटकारासह नाबाद ८२ धावा केल्या.

सामनावीर पुरस्कार मिळवणारा कर्णधार स्टीव्हन स्मिथ म्हणाला, ‘‘सलामीच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या क्षमतेचे दर्शन घडवले. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणे हे आव्हानात्मक होते. मात्र गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी झुंजार वृत्तीने खेळत हा विजय मिळवून दिला, या सर्व खेळाडूंचा मला अभिमान आहे.’’

गेल्या ३१ वर्षांत ब्रिस्बेनला झालेल्या आठ सामन्यांमध्ये इंग्लंडला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. याचप्रमाणे या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा संघ गेल्या २९ वर्षांत पराभूत झालेला नाही. विवियन रिचर्ड्सच्या वेस्ट इंडिज संघाने १९८८मध्ये या मैदानावर ऑस्ट्रेलियाला हरवण्याची किमया साधली होती. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरी कसोटी अ‍ॅडलेड ओव्हल येथे शनिवारपासून सुरू होणार आहे.

संक्षिप्त धावफलक

  • इंग्लंड (पहिला डाव) : ३०२, ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ३२८,
  • इंग्लंड (दुसरा डाव) : १९५, ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ५० षटकांत बिनबाद १७३ (डेव्हिड वॉर्नर नाबाद ८७, कॅमेरून बॅनक्रॉफ्ट नाबाद ८२)
  • सामनावीर : स्टीव्हन स्मिथ.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 12:44 am

Web Title: ashes test series australia beat england
Next Stories
1 श्रीलंकेविरुद्ध वन-डे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, विराटला विश्रांती; रोहित शर्मा भारताचा नवीन कर्णधार
2 नागपूरच्या खेळपट्टीविषयी विराटने व्यक्त केली नाराजी
3 डेनिस लिलींना मागे टाकत रविचंद्रन आश्विन विक्रमवीर, चौथ्या दिवसाच्या खेळात ‘या’ ८ विक्रमांची नोंद
Just Now!
X