भारताचा जलदगती गोलंदाज आशिष नेहरा आंतराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याच्या तयारीत आहे. मुंबई मिरर या वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त प्रसारित केलं आहे. गेली १८ वर्ष आशिष नेहरा भारतीय क्रिकेटसंघाचं प्रतिनिधीत्व करतो आहे. सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या टी-२० मालिकेसाठीही आशिष नेहराची संघात निवड झालेली आहे. मात्र गेल्या काही दिवसांत दुखापतीमुळे त्याला बराच काळ संघाबाहेर रहावं लागलं. सध्या आशिष नेहरा ३८ वर्षांचा आहे, त्यात क्रिकेटचं बदलेलं स्वरुप पाहता नेहरा आपली आंतराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द थांबवण्याच्या विचारात आहे.

अवश्य वाचा – ‘सचिन तेंडुलकर चाळीशीपर्यंत खेळला, मग नेहरा का नाही?’

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानूसार न्यूझीलंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर आशिष नेहरा आपल्या निवृत्तीची घोषणा करु शकतो. नेहराने आतापर्यंत १७ कसोटी, १२० वन-डे आणि २६ टी-२० सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. मात्र अनेक वेळा दुखापतीमुळे नेहराला संघाबाहेर बसावं लागलं होतं.

अवश्य वाचा – या वयात दीर्घकालीन उद्दिष्ट ठरविणे कठीण : आशिष नेहरा

आपल्या १८ वर्षांच्या कालावधीत आशिष नेहराने भारतीय गोलंदाजीची धुरा समर्थपणे वाहिली आहे. विशेषकरुन टी-२० सामन्यांमध्ये नवीन चेंडु हाताळण्याची आशिष नेहराची हातोटी वाखणण्याजोगी आहे. याच कारणासाठी निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आशिष नेहराला संघात जागा दिली आहे. पहिल्या टी-२० सामन्यात नेहराला संघात जागा मिळाली नव्हती. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये नेहराला संघात जागा मिळते का हे पहावं लागणार आहे.

अवश्य वाचा – नेहराला ट्रोल करणाऱ्या मिचेल जॉन्सनची नेटकऱ्यांकडून धुलाई