भारतीय संघातील आणि बंगालचा अनुभवी वेगवान गोलंदाज अशोक दिंडानं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. कोलकातामध्ये प्रसारमाध्यामांशी बोलताना ही माहिती दिली. त्यासोबतच सर्वांचे आभारही मानले.

३६ वर्षीय दिंडानं १३ एकदिवसीय आणि ९ टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. २०१९-२० च्या रणजी करंडक क्रिकेट हंदामात फक्त एक सामना खेळल्यामुळे बंगाल क्रिकेट संघटनेकडून त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे चालू हंगामाच्या पूर्वार्धात त्यानं गोव्याचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अशोड दिंडाच्या नावावर ४२० विकेट आहेत. दिंडा सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत अखेरचा खेळला आहे. या स्पर्धेत तो तीन सामने खेळला आहे. निवृत्तीची घोषणा करताना दिंडा म्हणाला की, भारतीय संघाकडू खेळण्याचं प्रत्येक खेळाडूचं लक्ष असतं. बंगालकडून खेळल्यामुळेच मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. भारतीय संघाकडून खेळण्याची संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचं आभार मानतो.