जुलै-ऑगस्टमध्ये होणार्‍या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कुस्ती सामन्यांत रेफरी म्हणून अशोक कुमार यांचा समावेश झाला आहे. कुमार हे एकमेव भारतीय कुस्ती रेफरी म्हणून ऑलिम्पिकमध्ये असतील. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या खेळाच्या प्रशासकीय मंडळाने त्यांना नामांकन दिले आहे.

”या स्पर्धेत निवडलेला मी एकमेव भारतीय रेफरी आहे. मी ऑलिम्पिक दरम्यान पदभार घेईन. ऑलिम्पिकमधील उमेदवारांची निवड करण्यासाठी निवड प्रक्रिया होती आणि मी ते निकष यशस्वीरित्या पूर्ण केले”, असे कुमार यांनी आयएएनएसला सांगितले.

हेही वाचा – इरफान पठाणसोबतच्या ‘त्या’ फोटोबद्दल बायकोनं सोडलं मौन, म्हणाली…

५० वर्षीय अशोक कुमार यांनी सांगितले की, रेफरीसाठी निवड प्रक्रिया कझाकिस्तानमधील २०१९च्या वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेपासून सुरू झाली. त्यानंतर गेल्या महिन्यात अल्माटी येथे आशियाई ऑलिम्पिक पात्रता झाली. २०१६च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सामील होण्यासाठीही भारतीय वायुसेनेतील कुमार यांना नामांकन मिळाले होते.

हेही वाचा – अवघ्या ‘दोन’ शब्दात विराटने सांगितले धोनीसोबतचे नाते!

कुमार यांना २००५मध्ये आंतरराष्ट्रीय रेफरी परवाना मिळाला. त्यानंतर २०१८च्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्स आणि जकार्ता एशियन गेम्स यासह १०० हून अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी काम केले आहे.