01 March 2021

News Flash

Video : अ‍ॅस्टन अगारने हवेतच टिपला भन्नाट झेल

चेंडू वेगाने जात असताना अगारने योग्य वेळी उडी मारली आणि...

अ‍ॅडलेड कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर १ डाव आणि ४८ धावांनी बाजी मारली. पहिल्या डावात ५८९ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पहिला डाव ३०२ धावांवर संपवला. यानंतर पाकिस्तानला फॉलोऑन देत, ऑस्ट्रेलियाने पाकचा दुसरा डावही २३९ धावांवर संपवत मालिकेत २-० असं निर्भेळ यश संपादन केलं.

ऑस्ट्रेलियात एकीकडे हा सामना रंगलेला असताना दुसरीकडे शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत एका खेळाडूने साऱ्यांचे लक्ष वेधले. सोमवारी ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या एका सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाज अ‍ॅस्टन अगार याने भन्नाट झेल टिपला. त्याने घेतलेल्या भन्नाट झेलाची सध्या तुफान चर्चा रंगली आहे.

गोलंदाजाने चेंडू टाकला. त्या चेंडूवर फलंदाजाने योग्य टप्प्यावर फटका खेळत चेंडू काहीसा फिल्डरच्या डोक्यावरून जाईल अशा प्रकारे टोलवला. चेंडू फिल्डरच्या डोक्यावरून टोलवताना चेंडू किती जवळून जाईल याचा अंदाज फलंदाजाला आला नाही. पण फिल्डर अगारने मात्र योग्य वेळी उडी मारत वेगाने जाणारा चेंडू हवेतच झेल टिपला. त्याने टिपलेला झेल पाहून सारेच अवाक झाले आणि साऱ्यांनी त्याच्या झेलाचे कौतुक केले.

ऑस्ट्रेलियात शेफिल्ड शिल्ड या क्रिकेट स्पर्धेत वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि साऊथ ऑस्ट्रेलिया या दोन संघात सामना रंगला होता. त्यावेळी अगारने हा अफलातून झेल टिपला आणि साऱ्यांना अवाक केले. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या ३४५ धावांचा पाठलाग करताना साऊथ ऑस्ट्रेलियाला पहिल्या धावेवरच पहिला धक्का बसला. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ८ बाद ४९२ धावांवर घोषित केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना साऊथ ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३५३ धावांमध्ये आटोपला. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने दुसरा डावही ६ बाद २०५ धावांवर घोषित केला. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून शॉन मार्शने दुसऱ्या डावात १०२ धावा केल्या. अ‍ॅस्टन अगारने अफलातून झेल तर टिपलाच पण त्यासह फलंदाजी करतानाही नाबाद ४५ धावा केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2019 6:00 pm

Web Title: ashton agar takes superb catch in the air fabulous catch video sheffield shield video vjb 91
Next Stories
1 “आता बस्स झालं…”; हैदराबादच्या घटनेवर विराटची संतप्त प्रतिक्रिया
2 Video : गोलंदाजाने केलेला हा विचित्र रन-आऊट एकदा पहाच
3 IPL 2020 : धोनीच्या नेतृत्वामुळे चेन्नई सुपरकिंग्ज आयपीएलमध्ये यशस्वी – संजय मांजरेकर
Just Now!
X